मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४ : Mukhyamantri Ladaki Bahin Yojana२०२४

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४

प्रस्थावन :-

तू भार्या ,तू भगिनी , तू दुहिता , तू प्रत्येक वीराची माता
तू नव्या युगाची प्रेरणा , या जगाची भाग्यविधाता……….
आज कालच्या धाव पळीच्या सामाजिक जीवनात जगात असताना एक वाहन मानले तर , स्रि आणि पुरुष हि रथाची दोन चाके आहेत .आणि जीवन जगात असताना रथाची दोन चाके मानले जाणारे महिला व पुरुष दोघेही मजबूत व निरोगी राहणे हे आपल्या कौटुंबिक
जीवनासाठी अगदी महत्वाचे आहे . सामाजिक जीवन जगत असताना समाजात महिला व पुरुष दोघं पैकी एक जरी कुंकुवात असेल
तर त्या जीवनला वाहन न राहता ते फक्त इंधन होईल . समाजातील प्रत्येक ,महिला व पुरुष या दोन्ही घटकांना सशक्त व प्रगतिशील करण्यासाठी महाराष्ट्र सरकार ,केंद्र सरकार तसेच या समाजात वावर णाऱ्या विविध घटकांचे कर्तव्य आहे . आपलूं अवती भोवती महिलांच्यासामाजिक व मानसिक स्थितीत बरीच सुधारणा तर झालीच आहे, , पण महिलांचा पूर्णत्व विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही . ज्या दिवशी समाजात वावरणाऱ्या महिलांचा विकास पूर्णत्व होईल त्याच वेळेस समाज हा पूर्ण होईल , व त्याच वेळी महिला हा समाजाचा एक महत्व पूर्ण दुवाभाव मानला जाईल

                एक सदन नागरिक म्हूणन पहिले गेले तर महिला हि एक अनेक शक्ती व रूपे असलेली मूर्ती आहे आणि तिच्या विकासाची व कल्याणाची कामना करणे हे एक नागरिक म्हणून आपल्या समाजचे व महाराष्ट्रातील व देशातील सरकारचे कर्तव्य आहे .

२ . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ध्येय :-

महाराष्ट्रातील महिलांमध्ये अनिमिया प्रमाण हे ५० टक्के पेक्षा जास्त आहे . तसेच महाराष्ट्र राज्यातील कामाच्या सर्वेक्षणा नुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी हि ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे , त्याच तुलनेत महिलांची टक्के वारी हि फक्त ३० टक्के एवढ च आहे . हि पार्शवभूमी पाहता महिलांच्या आर्थिक व आरोग्याचा विचार करता ह्या परीस्थित सुधारणा करणे हे खूप आवश्यक आहे . महिलांना सामाजिक जीवन जगत असताना आरोग्य , पोषण व आर्थिक स्थायतात स्वालंबनासाठी महाराष्ट्र राज्य सरकार राज्यात अनेक अश्या विविध योजनेचे उदघाटन करून त्या पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे . महिलांच्या पोषण व आरोग्य मध्ये सुधारणा करण्यासाठी व कुटुंबात महत्व पूर्ण अशी निर्णायक भूमिका मजबूत करण्यातही महाराष्ट्र व इतर राज्या तील सरकारने “मुख्यमंत्री -लाडकी बहीण योजना ” सुरु केली आहे . व तशी शाशनाने ह्या योजनेला प्रारंभ करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे .

३. मुख्यमंत्री लाडकी योजनेचा उद्देश :-

१. देशातील व महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन राज्यातील रोजगार निर्मितीस चालना देणे आहे .
२. देशातील व राज्यतील महिलांचे सामाजिक दृष्ट्या तसेच आर्थिक दृष्ट्या मनोबल वाढवून त्याचे पुनर्वसन करणे .
३. देशातील व राज्यतील महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर करणे व स्वतः च्या पायावर उभे करून स्वालंबी बनवणे आहे .
४. राख्या व देशातील महिला व मुलींचे स शक्तीकरण करून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे.

४. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वरूप :-

”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ” या योजने अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलेस तिच्या आधार लिंक असलेल्या राष्ट्रीय कृत बँक खात्यात दर महिना १५०० रुपये प्रमाणे DBT ( Direct Benifit Transfer )प्रणाली द्वारे रक्कम वर्ग केली जाईल . तसेच एखादी महिला केंद्र सरकार व राज्य सरकार च्या कोणत्या योजनेत १५०० रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्या फरकाची रक्कम ह्या योजने द्वारे पात्र महिलेस दिली जाईल .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४

५ . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी निकष :-

महाराष्ट्र सरकारने ह्या योजनेचा लाभ घेण्या साठी काही नियम व अटी नेमून दिलेल्या आहेत ह्या नियम व अटी प्रमाणे महाराष्ट्र राज्यात राहणारी २१ वर्ष ते ६० वर्ष या सर्व वयोगटातील मुली , महिला , विवाहित महिला , विधवा महिला , घटस्टपोटीत महिला व निराधार महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत .

६ . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रता निकष :-

१. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील महिला हि महाराष्ट्र राज्या तील रहिवाशी असणे हे शाशनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी प्रमाणे बंधन कारक आहे .
२. महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या मुली ,विवाहित महिला , विधवा महिला , घटस्फोटित महिला परितक्त्या आणि निराधार महिला ह्या सर्व ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात .
३ . ह्या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय हे किमान २१ वर्ष वय व कमाल ६० वर्ष वय असणे आवश्यक आहे व तसा लिखित स्वरूपात आपल्या गाव किंवा शहरात तील आपले सरकार केंद्र तुन घेणे बंधनकारक आहे .
४. सदरील ह्या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिला लाभार्थ्या कडे राष्ट्रीय कृत बँक चे पासबुक असणे हे गरजेचे आहे .
५. ह्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखां पेक्षा कमी असणे नियम व अटी प्रमाणे बंधनकारक आहे , तास उत्पनाचा दाखल देणे गरजेचे आहे

७. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कागदपत्रे :-

१. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थी महिलेचा लिखित स्वरूपात अर्ज
२. पात्र महिलेचे मोबाइलला लिंक असलेले आधार कार्ड
३. महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी दाखल
४. महिलेचा जन्माचा दाखल
५. लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखल
६. सक्षम अधिकारी तहसीलदार यांच्या मार्फत घेतलेला उत्पनाचा दाखल
७. राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक
८. पासपोर्ट साईझ दोन फोटो
९. रेशनकार्ड

१०. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलेचं अटी व शर्थी चे पालन करण्या बाबत चे स्वयं घोषणा पत्र किंवा हमी पत्र.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४

८. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सुरुवात दिनांक व अर्ज समाप्ती दिनांक :-

१. योजने अंतर्गत अर्ज करण्यास सुरुवात – १ जुलै २०२४
२. योजने अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० ऑगस्ट २०२४

९ . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची कार्यप्रणाली :-

सदरील योजने चा अर्ज हा महाराष्ट्र सरकारने दिलेली अँप द्वारे , ऑनलाईन पोर्टल द्वारे तसेच गाव व शहरातील आपले सुविधा केंद्र सेतू मध्ये ओंलीने पद्धतीने भरले जातील , त्यासाठी ची पुढील अर्ज प्रक्रिया असेल .
१. या योजने अंतर्गत पात्र महिलेस आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
२. जर एखाद्या महिलेस आपला अर्ज सादर करण्यासाठी अडचणी येत असेल तर त्या महिलेस आपला अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी / बाळ विकास केंद्र प्रकल्प अधिकारी कार्यलये उपलब्ध असतील जसे नागरी /ग्रामीण /ग्रामपंचायत /आदिवासी /सेतू /वॊर्ड इत्यादी .
३. वरील योजनेचा अर्ज हा अंगणवाडी / बाळ विकास केंद्र प्रकल्प अधिकारी कार्यलये जसे नागरी /ग्रामीण /ग्रामपंचायत /आदिवासी /सेतू /वॊर्ड ह्या केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्या द्वारे ऑनलाईन पद्धतीने सबमिट केला जाईल व ज्या वेळी लाभार्थी महिलेचा अर्ज हा स्वीकारला जाईल त्यावेळी त्या अर्जाची योग्य ती पोहोच पावती दिली जाईल .
४. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया हि विनामूल्य केली आहे .
५. अर्ज केलेल्या महिलेने स्वतः बोलावलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे . जेणेकरून लाभार्थी महिलेचा फोटो काढून त्याची E -KYC करता येईल त्यासाठी महिलेने रेशन कार्ड व स्वतःचे आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक असेल .

१०. लाभार्थी निवड :-

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या लाभार्त्याची पात्रता अंगणवाडी सेविका , परिवक्षिका , सेतू सुविधा केंद्र ,मुख्यसेवीका वार्ड अधिकारी ,ग्रामपंचायत , ग्रामसेवक या अधिकाऱयांनी ह्या अर्जाची छाननी करून तो अर्ज online प्रमाणित केल्यानंतर तो लाभार्थी महिलेचा अर्ज हा सक्षम अधिकारी ह्यांच्याकडे सादर करावा . ह्या सर्व निवड प्रक्रिया प्रणालीमध्ये सक्षम अधिकारी ह्या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवतील .

११. नियंत्रण अधिकारी :-

महिला व बालं विकास केंद्र ,आयुक्त , महाराष्ट्र राज्य पुणे हे या योजनेच्या नियंत्रण अधिकारी असतील व तसेच आयुक्त , एकात्मिक बाल विकास सेवा योजना , नवी मुंबई हे ह्या योजना प्रणालीचे सह नियंत्रण अधिकारी असतील .

EXTERNAL LINKS :-

मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४

लिंक साठी येथे क्लिक करा (……..)

 

 

Leave a Comment