राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२४ :

Table of Contents

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य २०२४अंतर्गत नागपूर व नंदुरबार महानगरपालिकेत नोकरीची संधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२४

आपल्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात काम करत असलेल्या कर्मचाऱयांपैकी १० वर्ष व १० वर्षा हुन अधिक सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत पुढील जबाबदार पदावर सामावून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यच्या मंत्रिमंडळाने बैठक घेऊन ह्या कंत्राटी भरतीस मान्यता दिली आहे . महाराष्ट मधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्या ना या निर्णयाचा फायदा होणार आहे . मंत्रिमंडळाने निर्णय घेत असताना यामध्ये १० वर्ष वयाची अट देखील शिथिल करण्यात आली आहे . तसेच आरोग्य विभागाच्या नियोजित पदासाठीची नियमात हवे असेल ते बदल करून कंत्राटी कामगारांचे आरोग्य सेवेतील सक्षम पदावर रिक्त झालेल्या पदांच्या ३० टक्के प्रमाणात नियोजन केले जाणार आहे. तर उर्वरित ७० टक्के पदे हे सरळ कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत . ह्या निर्णयच फायदा हा राज्यातील या घटकाशी निगडित असणाऱ्या घटकांना होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील नागपूर व नंदुरबार महानारपालिकेत विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारने महानारपालिका तसेच भरती प्रक्रियेत समाविष्ठ असणाऱ्या सहा अधिकार्यां ना दिले आहेत.                                                                                    चला तर मित्रांनॊ आता आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत नागपूर व नंदुरबार महानगरपालिकेत होणाऱ्या कंत्राटी नोकर भरती विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात .
राष्टीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत होणाऱ्या नागपूर भरती प्रक्रिये ची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे :-
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत नागपूर महानगरपालिकेत विविध अश्या १०५ रिक्त पदांसाठी हि भरती जाहीर करण्यात आली आहे . या सर्व पदांच्या भरती प्रक्रियांसाठी इच्छुक उमेदवारांनी नियुक्ती हि नेमून दिलेल्या ठिकाणी मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे . दिनांक ५ सप्टेंबर २०२४ व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नियोजीत ठिकाणी होणार आहेत. हि भरती प्रक्रिया नागपूर महानारपालिका क्षेत्रात येणाऱ्या १५ दवाखान्यातील रिक्त पदांसाठी होणार आहे . त्या भरती प्रक्रियांमध्ये सामील होण्यासाठी काही आवश्यक असणारी कागदपत्रे आणि दिल्या जाणाऱ्या पगार /वेतन संदर्भात माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे . हि भरती प्रक्रिया नागपूर महानगरपालिका अंतर्गत येणारी १५ दवाखान्यांमध्ये रिक्त पदांसाठी होणार आहे . यामधील चार दवाखाने हे कार्यान्वित आहे तर उर्वरित ११ दवाखाने हे पुढील काही दिवसांमध्ये कार्यान्वित होतील . अशी माहिती नागपूर महानारपालिकेने दिली आहे .

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२४

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत नागपूर महानगरपालिकेत होणाऱ्या भरती साठी पुढील पात्र होणाऱ्या उमेदवाराचे नियुक्ती होणार आहे :-

१. डॉक्टर
२. श्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीतज्ञ
३. मानसोपचार तज्ज्ञ
४. कान ,नाक ,घसा तज्ज्ञ
५. त्वचारोग तज्ज्ञ
६. नेत्र रोग तज्ज्ञ
७. बाल रोग तज्ज्ञ
इत्याद

नागपूर मध्ये होणाऱ्या ह्या भरती मध्ये प्रत्येक क्लिनिक मध्ये या सर्व पदांची भरती केली जाणार आहे . त्यासाठी सर्व १५ क्लिनिक मध्ये या सर्व तज्ज्ञ च्या १०५ रिक्त जांगांवर त्यांच्या catagory नुसार भरती केली जाणार आहे . हि भरती पार पडल्यानंतर या भरती मध्ये पात्र झालेल्या सर्व कर्मचाऱ्या ना ठरवून दिलेल्या दिवशी दर महिन्यला क्लिनिक ला ठराविक वेळेत VISIT देणे हे बंधनकारक राहील . खाली दिलेल्या नियमांप्रमाणे क्लिनिक ला भेट देणे आवश्यक आहे .

NHM NAGPUR POLYCLINIC VISIT :पद व अपेक्षित भेट वेळापत्रक :-

१. डॉक्टर                                                                              ४ VISIT प्रत्येक महिना
२. श्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीतज्ञ                                                       ४ VISIT प्रत्येक महिना
३. मानसोपचार तज्ज्ञ                                                                २ VISIT प्रत्येक महिना
४. कान ,नाक ,घसा तज्ज्ञ                                                          २ VISIT प्रत्येक महिना
५. त्वचारोग तज्ज्ञ                                                                     २ VISIT प्रत्येक महिना
६. नेत्र रोग तज्ज्ञ                                                                       २ VISIT प्रत्येक महिना
७. बाल रोग तज्ज्ञ                                                                     ४ VISIT प्रत्येक महिना

नियुक्त उमेदवाराने दिलेल्या भेटीचा (VISIT) चा अपेक्षित मोबदला म्हून प्रत्येक भेटीसाठी डॉक्टर व इतर स्पेसिऍलिस्ट साठी २०००रुपय ते ५००० रुपय इतके पैसे घेता येणार आहेत .

EDUCATIONAL QUALIFICATION : शैक्षणिक पात्रता :-

या सर्व पात्र पदांवर रुजू होण्यासाठी उमेदवाराकडून ठरवून दिलेल्या पात्रतेची अट पूर्ण केली जाणे हे आवश्यक आहे . विशिष्ट्य पदावर रुजू होण्याकरिता पात्र उमेदवारास तयासाठी लागणारी आवश्यक ती विषया मधील पात्रतेची पदवी पदवी उत्तीर्ण झालेली असणे बंधनकारक आहे .

रिक्त पद                                                                                                              पात्रता
१. डॉक्टर                                                      –                                       एम डी (मेडिसिन ), डी एन बी
२. श्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीतज्ञ                               –                                  एम डी ,एम एस ,डी जी ओ ,डी एन बी
३. मानसोपचार तज्ज्ञ                                       –                                      एम डी ( ) ,डी पी एम , डी एन बी
४. कान ,नाक ,घसा तज्ज्ञ                                 –                               एम एस ( ई एन टी ) , डी ओ आर एल , डी एन बी
५. त्वचारोग तज्ज्ञ                                            –                                   एम डी ( वी डी ) , डी व्ही डी , डी एन बी
६. नेत्र रोग तज्ज्ञ                                             –                                             एम एस , डी ओ एम एस
७. बाल रोग तज्ज्ञ                                            –                                                एम डी , डी एन बी

अर्ज व आवश्यक कागदपत्रे :-

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियांमध्ये मुलाखत फेरी हि घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचा संपूर्ण अर्ज भरून तसेच भरती प्रक्रियांत आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे . भरती प्रक्रिया मध्ये इच्छुक उमेदवाराने दिलेल्या ठिकाणी तारखेनुसार वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे . वेळेची मर्यादा हि ठरवून दिली असणार आहे .
भरती प्रक्रियांसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे : –
१. शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
२. अनुभव प्रमाणपत्रे
३. रहिवासी दाखल
४. महाराष्ट्र मेडिकल counsil नोंदणीकरण प्रमाणपत्रे

दिनांक व वेळ :-
१. भरती प्रक्रिया मध्ये पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती ह्या Walk In Interview प्रमाणे घेतल्या जातील व नियुक्ती केली जाईल .
२. दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी पहिली मुलाखत फेरी पार पडणार आहे .
३. त्यानंतर ठराविक वेळ व वारानुसार प्रत्येक महिण्याच्या पहिल्या गुरुवारी   मुलाखत फेऱ्या पार पडतील .

वेळ :
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत नागपूर महानगरपालिका ने भरती प्रक्रियांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवाराने यांनी नेमू दिलेल्या दिवशी सकाळी १० वाजता ते १२ वाजता नियोजित ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य राहील .

मुलाखत होणाऱ्या जागेचे ठिकाण :-
नागपूर महानगरपालिका , आरोग्य विभाग , मजला क्रमांक ५ , सिव्हिल लाईन , नागपूर.

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२४

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत नंदुरबार भरती प्रक्रियांची माहिती पुढील प्रमाणे :-

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविणायास महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडने मान्यता दिली आहे . नंदुरबार जिल्ह्यासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियांमध्ये १३८ पदाची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे . त्या साठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे तसेच शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे असणे बंधंनकारक आहे . त्यासाठी ची निवड प्रक्रिया हि नंदुरबार महानारपालिकाने ठरवून दिलेल्या योग्य ठिकाणी होईल . तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया खाली दिलेल्या PDF मध्ये दर्शविल्या प्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर PDF मध्ये दिलेल्या पदांसाठी ठरवून दिलेल्या पात्र उमेवारांकडून अर्ज मागविणात येत आहेत .
पदभरती PDF (……) खालीलप्रमाणे .

अर्ज व आवश्यक कागदपत्रे :-
१. विहित नमुण्यातील अर्ज
२. वयाचा दाखला / पुरावा
३. शैक्षणिक प्रमाणपत्रे ( सर्व वर्षाचे प्रमाणपत्रे )
४. सर्व वार्षिक गुणपत्रिका
५. कौन्सिल regestration प्रमाणपत्रे
६. शासकीय कामाचे अनुभव प्रमाणपत्रे
७. जात प्रमाणपत्रे .

नियम व अटी :-
१. अर्जदाराचे कागदपत्रे अपूर्ण असल्यास त्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे व कागदपत्रे सादर करण्याची पुन्हा संधी भेटणार नाही .
२. शुल्क हे खुल्या उमेदवारांसाठी १५० रुपये इतके तर राखीव उमेदवारांसाठी १०० रुपये प्रमाणे राष्ट्रीय कृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट द्वारे भरावा .
३. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरती साठी दोन मुलांची अट शासनाने घालून दिली आहे , दोन पेक्षा अधिक मुले असलेले अर्जदार अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत .
४. केंद्र व राज्य सरकारने संबंधित पदे रद्द किंवा नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्व सूचना किंवा पूर कल्पना न देता तात्काळ रद्द /समाप्त करण्यात येतील .
५. अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच उमेदवारा विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.                                                                                                                                                  ६. राखीव प्रवर्गातून अर्ज करणारी अर्जदारांनी त्यांच्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे . जातीचे प्रमाणपत्र न सादर केलेल्या अर्जदाराचा अर्जाचा पात्रतेसाठी विचार केला जाणार नाही .अश्या उमेदवारांना राखीव स वर्गाचा लाभ हा घेता येणार नाही .
७. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्याच्या सोईनुसार कामाचे ठिकाण बदलून मिळणार नाही व तशी मागणी हि करता येणार नाही .
८. अर्जदाराचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्यास तो अर्ज बाद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी हि अर्जदाराची राहील .
९. एक किंवा त्यापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास अर्जदाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे .
१०. भरती प्रक्रियांचे सर्व अधिकार , पद कमी करणे , भरतीची प्रक्रिया रद्द करणे , अटी व शर्थी मध्ये बदल करणे , हे सर्व अधिकार व निवड प्रक्रिया मध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार हे माननीय मुख्य अधिकारी , जिल्हा परिषद , नंदुरबार यांनी राखून ठेवलेले आहेत.

EXTERNAL LINKS :

नवीन योजना संधर्भात जाणून घेण्यातही खालील लिंक पहा . (……)

ENTERNAL LINKS :

LINKS : (………)

 

 

 

Leave a Comment